10 वी व 12 वी ची परीक्षा 4 ऑक्टोबर पासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्यातर्फे सप्‍टेंबर/ ऑक्टोबर 2012 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्रपरीक्षा (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी ) ची परीक्षापुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊविभागीय मंडळात गुरुवार 4 ऑक्टोबर 2012 पासून सुरु होणार आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) ची लेखी परीक्षा 4 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2012 पर्यंत घेण्यात येणार आहे. शास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी 4ऑक्टोबर 2012 ते 17 ऑक्टोबर 2012 (लेखी परीक्षेच्या कालावधीत) आहे. श्रेणी व तोंडीपरीक्षा शुक्रवार दिनांक 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2012 या कालावधीत होणार असून, तंत्र व पूर्व व्यावसायिक परीक्षा 18 ते 

20 ऑक्टोबर 2012 रोजी तर अंध, अपंग, मूकबधिर, बहुविकलांग व अध्ययन अक्षमता वैगुण्यअसलेल्या विद्यार्थ्यांची कार्यानुभव विषयांतर्गत येणाऱ्या विषयांची लेखी वप्रात्यक्षिक परीक्षा 19 ते 31 ऑक्टोबर 2012 या कालावधीत होणार आहे. आऊट ऑफ टर्न (जे विद्यार्थी उपरोक्त दिलेल्या कालावधीत काही कारणास्तव प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परिक्षमध्ये बसू शकणार नाहीत त्यांच्यासाठी ) परीक्षा 30 व 31 ऑक्टोबर 2012रोजी घेण्यात येणार आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) ची लेखीपरीक्षा गुरुवार 4 ते मंगळवार 23 ऑक्टोबर 2012 या कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक/ तोंडी/ श्रेणी परीक्षा 21सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2012 रोजी तर आऊट ऑफ टर्न ( जे विद्यार्थी उपरोक्त दिलेल्या कालावधीतकाही कारणास्तव प्रात्यक्षिक तोंडी आणि श्रेणी परिक्षमध्ये बसू शकणार नाहीतत्यांच्यासाठी ) परीक्षा 27 ते 29 ऑक्टोबर 2012 रोजी घेण्यात येणार आहे, असे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, वाशी, नवी मुंबई यांनी कळविले आहे.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310440
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
392
384
1190
306392
6716
9677
310440

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 53 guests and no members online