पहिली अमेरिकन महिला अंतराळवीर सॅली राईड कालवश

अंतराळसफर करणारी पहिली अमेरिकन महिला सॅली राईड यांचे २३ जुलै २०१२ रोजी कॅलिफोर्निया येथे निधन झाले. त्‍या ६१ वर्षांच्या होत्या. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. उत्कृष्ट टेनिसपटू असलेल्या राईड यांच्याकडे भौतिकशास्त्राच्या डॉक्टरेटसह चार पदव्या होत्या. १९७८ मध्ये नासाने निवडलेल्या ३५ जणांमध्ये राईड यांचा समावेश होता. यासाठी ८ हजार अर्ज आले होते. १८ जून १९८३ रोजी 'चॅलेंजर' यानाद्वारे त्या प्रथम रवाना झाल्या. अंतराळसफर करणाऱ्या अमेरिकेच्‍या पहिल्या महिला हा मान मिळवण्याबरोबरच अंतराळात जाणाऱ्या सर्वात तरुण व्यक्तीचा बहुमानही त्यांना मिळाला.

  •  अंतराळाची सफर करणाऱ्या सॅली राईड या जगातील तिसऱ्या महिला होत्या.
  • त्यांच्या आधी जून १९६३ मध्ये रशियाच्या व्हॅलेंटिना टेरेश्कोव्हा यांनी अंतराळ सफर केली. त्‍या जगातील पहिल्‍या महिला आहेत ज्‍यांनी अंतराळ सफर केली. त्‍यांनंतर १९८२ मध्ये रशियाच्याच स्वेटलाना सॅव्हिस्काया यांनी अंतराळ सफर केली आहे.
  •  सॅली राईड यांच्या १९८३ च्या अंतराळसफरीनंतर ४५ महिला अंतराळात गेल्या. सॅली राईड या जवळपास ३४३ तास अंतराळात होत्या.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310409
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
361
384
1159
306392
6685
9677
310409

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 24 guests and no members online