अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्याकांनाच प्रवेश नाकारल्यास तक्रार करा

राज्यातील धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये संबंधित अल्पसंख्याक विद्यार्थ्यास आरक्षित जागेवर प्रवेश न मिळाल्यास त्यांनी याबाबत अल्पसंख्याक विकास विभाग किंवा तंत्रशिक्षण संचालनालयाकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील धार्मिक (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौद्ध, जैन) आणि भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये संबंधित अल्पसंख्याक समुहास जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुदानित अल्पसंख्याक संस्थांमध्ये 50 टक्के तर विनाअनुदानित अल्पसंख्याक संस्थांमध्ये 51 टक्के जागा संबंधित अल्पसंख्याक विद्यार्थ्यांस राखीव आहेत. या राखीव जागेवर संबंधित अल्पसंख्याक विद्यार्थ्यास प्रवेश न मिळाल्यास संबंधित अल्पसंख्याक विद्यार्थी तक्रार करु शकतो. यासाठी त्यांनी अल्पसंख्याक विकास विभाग, सातवा माळा, विस्तारीत इमारत, मंत्रालय, मुंबई-32 येथे किंवा संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय यांच्याकडे लेखी तक्रार करावी किंवा अवर सचिव श्री.सुर्वे (9819824156), तंत्रशिक्षण उपसंचालक श्रीमती अत्तार (9323460040) किंवा कक्ष अधिकारी आ.श.शेंडगे (022-27869538) यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत 9, 18 व 21 जुलै 2012 रोजी संस्था/ जिल्हानिहाय अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त जागांबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संस्थांनी अल्पसंख्याक कोट्यातील जागांवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे बंधनकारक आहे.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310451
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
403
384
1201
306392
6727
9677
310451

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 63 guests and no members online