10 वी व 12 वी ची परीक्षा 4 ऑक्टोबर पासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्यातर्फे सप्‍टेंबर/ ऑक्टोबर 2012 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्रपरीक्षा (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी ) ची परीक्षापुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊविभागीय मंडळात गुरुवार 4 ऑक्टोबर 2012 पासून सुरु होणार आहे.

Read more...

दुधाळ म्हशी, गाई व शेळयांचा गट पुरविणे योजना बंद

आदिवासी विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ म्हशी,गाई व शेळयांचा गट पुरविणे या योजनेत पूर्वी झालेली अनियमितता तसेच याचप्रकारचीनवीन स्वरुपाची योजना कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडूनराबविण्यात येत असल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय 24 जुलै 2012 रोजी शासनानेघेतला आहे.

आदिवासी विकास विभागाने 9 ऑक्टोबर 2006 रोजीआदिवासी उपयोजना क्षेत्रात व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्याकुटूंबांकरिता दुधाळ जनावरे व शेळयांचा गट पुरविणे ही योजना सन 2006-07 ते 2009-10या चार वर्षात राबविण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेची मुदत संपलेली असल्यानेही योजना सन 2011-12 या वर्षाकरिता स्थगित ठेवण्या संदर्भात शासनाने 5 सष्टेंबर2011 रोजी निर्णय घेतला होता. या योजनेत सुधारणा करुन या योजनेला मुदतवाढ देणे,बंद करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पहिली अमेरिकन महिला अंतराळवीर सॅली राईड कालवश

अंतराळसफर करणारी पहिली अमेरिकन महिला सॅली राईड यांचे २३ जुलै २०१२ रोजी कॅलिफोर्निया येथे निधन झाले. त्‍या ६१ वर्षांच्या होत्या. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. उत्कृष्ट टेनिसपटू असलेल्या राईड यांच्याकडे भौतिकशास्त्राच्या डॉक्टरेटसह चार पदव्या होत्या. १९७८ मध्ये नासाने निवडलेल्या ३५ जणांमध्ये राईड यांचा समावेश होता. यासाठी ८ हजार अर्ज आले होते. १८ जून १९८३ रोजी 'चॅलेंजर' यानाद्वारे त्या प्रथम रवाना झाल्या. अंतराळसफर करणाऱ्या अमेरिकेच्‍या पहिल्या महिला हा मान मिळवण्याबरोबरच अंतराळात जाणाऱ्या सर्वात तरुण व्यक्तीचा बहुमानही त्यांना मिळाला.

Read more...

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्याकांनाच प्रवेश नाकारल्यास तक्रार करा

राज्यातील धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये संबंधित अल्पसंख्याक विद्यार्थ्यास आरक्षित जागेवर प्रवेश न मिळाल्यास त्यांनी याबाबत अल्पसंख्याक विकास विभाग किंवा तंत्रशिक्षण संचालनालयाकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

Read more...

कॅप्टन लक्ष्मी सहगल

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नजीकच्या सहकारी आणि इंडियन नॅशनल आर्मीमधील रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे सोमवारी २३ जुलै २०१२ रोजी उत्तरप्रदशातील कानपूर  येथील खाजगी रुग्णालयात हृदय विकाराने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली.

२४ ऑक्टोबर १९१४ रोजी जन्मलेल्या लक्ष्मी सहगल पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांना १९९८ मध्ये पद्मविभूषण या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले होते. त्‍यांनी १९७१ मध्‍ये कम्युनिस्ट पक्षा(एम)मध्ये प्रवेश केला. तसेच, त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्वही स्वीकारले. त्‍यांनी माजी राष्‍ट्रपती ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांच्‍या विरोधात राष्‍ट्रपतीपदासाठी उमेदवार म्‍हणून निवडणूकीस उभ्‍या होत्‍या.

त्‍यांचा जन्‍म चैन्‍नई येथे झाला होता. त्‍यांचे जन्‍म नाव लक्ष्‍मी स्‍वामीनाथन असे होते. पुढे त्‍या 'कॅप्‍टन लक्ष्‍मी' या नावाने प्रसिद्ध पावल्‍या.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310457
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
409
384
1207
306392
6733
9677
310457

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 68 guests and no members online