सामान्‍य ज्ञान

कोणत्‍या शहरास भारतातील पहिले सुनियोजीत शहर म्हणुन ओळ्खले जाते

चंदिगढ हे भारतातील पहिले सुनियोजीत शहर म्‍हणुन ओळखले जाते. चंदिगढ ही पंजाव व हरियाणा या दोन राज्‍यांची राजधानी आहे. चंदिगढ हा केंद्रशासित प्रदेश आहे. या शहरास सिटी ब्यूटीफुल या विशेषणाने देखिल ओळखले जाते.

कोणत्‍या विमानतळास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते?

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील सांताक्रुझ उपनगरात हे विमानतळ वसवलेले आहे. भारतातील तसेच दक्षिण एशियातील प्रवासी वाहतुकीचे संदर्भात,सर्वात व्यस्त विमानतळ आहे. यामुळे  छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळास  भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते.

मुंबई विद्यापीठची स्थापना कधी झाली?

मुंबई विद्यापीठ हे भारतातील विद्यापीठांपैकी एक जुने आणि प्रमुख विद्यापीठ आहे. "वुड्स शैक्षणिक योजने" अंतर्गत मुंबई विद्यापीठची स्थापना सन १८५७ मध्ये झाली आणि भारतातील प्रथम तीन विद्यापीठांपैकी एक असा मान मिळवला.

महाराष्‍ट्र राज्‍याची स्‍थापना कधी झाली?

महाराष्‍ट्र राज्‍याची स्‍थापना सन १९६० साली झाली.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

323665
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
314
435
2863
317834
7448
12493
323665

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 5 guests and no members online