भारताचे १३वे राष्‍ट्रपती

देशाचे १३वे राष्‍ट्रपती म्‍हणून प्रणव मुखर्जी यांची निवड झाली आहे. देशाच्‍या १२व्‍या राष्‍ट्रपती म्‍हणून प्रतिभा पाटील यांनी कार्यभार सांभाळला.

प्रणव मुखर्जी कॉंग्रेस पक्षाचे ते ज्‍येष्‍ठ नेता म्‍हणून परिचित आहेत. त्‍यांनी राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. राष्‍ट्रपतीपदी निवडून येण्‍याआधी ते देशाचे अर्थमंत्री म्‍हणून जबाबदारी संभाळत होते.

दिनांक २५ जुलै २०१२ रोजी त्‍यांचा राष्‍ट्रपतीपदाचा शपथविधी होईल. ते भारत सरकार तर्फे पद्मविभुषण या पदवीने सन्‍मानित आहेत. सन २००८ मध्‍ये त्‍यांना या पदवीने सन्‍मानित करण्‍यात आले.

भारताचे राष्‍ट्रपती हे भारत देशाचे राष्‍ट्रप्रमुख व प्रथम नागरीक असतात. सोबतच ते भारतीय सशस्‍त्र सेनेचे प्रमुख सेनापती असतात.

राष्‍ट्रपतीपदाचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो परंतु ते सलग दुसऱ्या कालावधीसाठी निवडणुक लढवू शकतात. आत्तापर्यंत भारताचे प्रथम राष्‍ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा राष्‍ट्रपतीपदी राहिले आहेत.