ऑलिंपिक

ऑलिंपिक खेळांचा इतिहास ३००० वर्षांचा आहे. प्राचीन ग्रीस देशातील ऑलिंपिया या स्थळी ऑलिंपिक खेळ भरत असत. त्यावरुन या सामन्यांना ऑलिंपिक क्रीडासामने हे नाव पडले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्व राष्ट्रांकरिता दर चार वर्षांनी निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने भरविले जातात.