३०, २००, ६०००

२६ जून २०१२ रोजी राष्‍ट्रनायक छत्रपती शाहू महाराज यांच्‍या जयंती निमित्त आम्‍ही क्रांतिज्‍योती मार्फत 'क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र' ची वेबसाईट प्रकाशित केली. अद्याप केवळ सुरुवातच आहे. जमेल तशी थोडी-थोडी माहिती आम्‍ही वेबसाईटवर प्रकाशित करीत आहेत.

वेबसाईट अपडेट करण्‍यासाठी माहिती संकलीत करावी लागते. या करीता वेळ द्यावा लागतो. चार ओळींची माहिती प्रकाशित करण्‍यासाठी तासभर कार्य करावे लागते. वर्तमानपत्रे वाचावी लागतात, पुस्‍तकांचा संदर्भ घ्‍यावा लागतो. याकरीता वेळ द्यावा तर लागणारच.

ही बाब केवळ वेळ देण्‍याची नाही. कौशल्‍यपूर्ण वेळ तर द्यावा लागतोच, पण वेबसाईट म्‍हंटले म्‍हणजे कॉम्‍युटर, इंटरनेट, लाईटबील, बसण्‍यासाठी कार्यालयीन जागा या सर्व बाबी ओघानेच आल्‍या. आमच्‍या मित्रांनी आम्‍हाला कॉम्‍प्‍युटर दिल्‍यामुळे आम्‍ही हे कार्य करु शकत आहोत. दोन व्‍यक्‍ती सध्‍या या वेबसाईटच्‍या उभारणीकरीता प्रयत्‍न करीत आहेत. 

सध्‍या नोकरीसंधीची माहिती आम्‍ही देत आहोत तरीदेखील रोज सरासरी २०० हिंट्स या वेबसाईटला होत आहेत. ३० दिवसांत व्‍हीजीटर्स काऊंटर वर ६००० हिंट्चा आकडा पार केला आहे.

लवकरच आम्‍ही विविध माहिती वेबसाईटरवर प्रकाशित करणार आहोत. राज्‍यसेवा व अन्‍य स्‍पर्धात्‍मक परिक्षांसाठी तयारी करणाऱ्या अभ्‍यासकांसाठी माहिती खुली करणे हा आमचा उद्देश आहे. आपला साथ सहयोग अपेक्षीत आहे.

- व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त
क्रांतिज्‍योती

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

323668
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
317
435
2866
317834
7451
12493
323668

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 8 guests and no members online