सामान्‍य ज्ञान

भारताचे १३वे राष्‍ट्रपती

देशाचे १३वे राष्‍ट्रपती म्‍हणून प्रणव मुखर्जी यांची निवड झाली आहे. देशाच्‍या १२व्‍या राष्‍ट्रपती म्‍हणून प्रतिभा पाटील यांनी कार्यभार सांभाळला.

प्रणव मुखर्जी कॉंग्रेस पक्षाचे ते ज्‍येष्‍ठ नेता म्‍हणून परिचित आहेत. त्‍यांनी राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. राष्‍ट्रपतीपदी निवडून येण्‍याआधी ते देशाचे अर्थमंत्री म्‍हणून जबाबदारी संभाळत होते.

दिनांक २५ जुलै २०१२ रोजी त्‍यांचा राष्‍ट्रपतीपदाचा शपथविधी होईल. ते भारत सरकार तर्फे पद्मविभुषण या पदवीने सन्‍मानित आहेत. सन २००८ मध्‍ये त्‍यांना या पदवीने सन्‍मानित करण्‍यात आले.

भारताचे राष्‍ट्रपती हे भारत देशाचे राष्‍ट्रप्रमुख व प्रथम नागरीक असतात. सोबतच ते भारतीय सशस्‍त्र सेनेचे प्रमुख सेनापती असतात.

राष्‍ट्रपतीपदाचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो परंतु ते सलग दुसऱ्या कालावधीसाठी निवडणुक लढवू शकतात. आत्तापर्यंत भारताचे प्रथम राष्‍ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा राष्‍ट्रपतीपदी राहिले आहेत.

पहिली महिला मुख्‍यमंत्री

सुचेता कृपलानी (२५ जून १९०८ - १ डिसेंबर १९७४) या देशातील पहिल्‍या महिला मुख्‍यमंत्री होत. त्‍या उत्तरप्रदेश राज्‍याच्‍या पहिल्‍या महिला मुख्‍यमंत्री होत्‍या. त्‍यांनी २ ऑक्‍टोबर १९६३ ते १४ मार्च १९६७ या कालावधीत मुख्‍यमंत्री पदाचा भार वाहिला. 

याच उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्षाच्‍या मायावती या मुख्‍यमंत्री बनल्‍या. अनुसूचित जातीतील देशातील पहिल्‍या महिला मुख्‍यमंत्री बनण्‍याचा मान मायावती यांना जातो. त्‍या आत्तापर्यंत चार वेळा उत्तरप्रदेश राज्‍याच्‍या मुख्‍यमंत्री बनल्‍या.

महाराष्ट्रात कॉफीचे मळे कोठे आहेत

अमरावती जिल्ह्यातील ‘चिखलदरा’ हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान व राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत. चिखलदरा ‘विदर्भाचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. 

महाराष्‍ट्र राज्‍यातील पहिला साखर कारखाना

डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून, १९५०). सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते.

ऑलिंपिक

ऑलिंपिक खेळांचा इतिहास ३००० वर्षांचा आहे. प्राचीन ग्रीस देशातील ऑलिंपिया या स्थळी ऑलिंपिक खेळ भरत असत. त्यावरुन या सामन्यांना ऑलिंपिक क्रीडासामने हे नाव पडले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमार्फत सर्व राष्ट्रांकरिता दर चार वर्षांनी निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने भरविले जातात.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310437
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
389
384
1187
306392
6713
9677
310437

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 50 guests and no members online