चालू घडामोडी

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण २३ विधेयकांपैकी १७ विधेयके मंजूर झाली असून सहा विधेयके प्रलंबित असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

दोन्ही सभागृहात संमत विधेयकांची यादी पुढीलप्रमाणे :

१. महाराष्ट्र गृहनिर्माण विधेयक, २०१२ 

२. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक, २०१२

३. मुंबई शेतजमीन व कुळवहिवाट, हैदराबाद शेतजमीन व कुळवहिवाट आणि मुंबई (विदर्भ प्रदेश) शेतजमीन व कुळवहिवाट सुधारणा विधेयक, २०१२

४. महाराष्ट्र जमिन महसुल संहिता सुधारणा विधेयक 

५. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिकनगरी सुधारणा विधेयक, २०१२ 

६. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०१२ 

७. मुंबई ग्रामपंचायत दुसरी सुधारणा विधेयक, २०१२

८. मुंबई मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०१२ 

९. पॅरा मेडिकल व्यवसायींची नोंदणी व व्यवसायाचे विनियमन करणारे महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद विधेयक, २०१२ 

१०. महाराष्ट्र महानगरपालिका व नगर परिषदा (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१२

११. महाराष्ट्र महानगरपालिका व नगर परिषदा विधेयक

१२. विवक्षित मुंबई अधिनियमांच्या संक्षिप्त नावांत बदल करणारे महाराष्ट्र विधेयक, २०१२ 

१३. महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोग (सुधारणा) विधेयक, २०१२

१४. नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम निरसित करुन नागपूर शहराला प्रांतिक महानगरपालिका अधिनियम लागू करणारे मुंबई प्रांतिक महानगरपालिका (सुधारणा) व नागपूर शहर महानगरपालिका विधेयक, २०१२ 

१५. मुंबई महानगरपालिकेने भाडेपट्टयाने दिलेल्या भुखंडाचे आणखी हस्तांतरण केल्यास त्यावरील अनर्जित उत्पन्नावर अधिमूल्य (प्रिमियम) आकारण्याची तरतूद करणे व मुंबई महानगरपालिकेने केलेल्या अधिमूल्याचे विधिग्राह्यीकरण करणारे मुंबई महानगरपालिका (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०१२

१६. महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक.

१७. ग्रामपंचायतींना स्थानिक पंचायत कर बसविण्याची मुभा देणारे मुंबई ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०१२

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310449
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
401
384
1199
306392
6725
9677
310449

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 61 guests and no members online