चालू घडामोडी

महाराष्‍ट्रातील एकूण ८ स्‍थळे जागतिक वारसा यादीत

यूनेस्‍कोच्‍या जागतिक वारसा स्‍थळांच्‍या यादीत १ जुलै २०१२ रोजी भारताच्‍या पश्चिम घाटास सामा‍विष्‍ठ करण्‍यात आले. रशियाच्‍या सेंट पिटर्सबर्ग शहरात इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) समितीच्या ३६ व्‍या सत्राच्‍या बैठकीत रविवारी जगातील २१ देशांमधील पर्यावरणतज्ज्ञ उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

पश्चिम घाटातील ३९ स्‍थळांना या यादीत सामाविष्‍ठ करण्‍यात आले आहे. यामध्‍ये केरळमधील सर्वात जास्‍त  म्‍हणजे २० स्‍थळ आहेत, त्‍यानंतर कर्नाटक १० स्‍थळ, तामिळनाडू ५ स्‍थळ व महाराष्‍ट्रातील ४ स्‍थळांचा समावेश आहे. महाराष्‍ट्रातील कास पठार, कोयना वन्‍यजीव अभयारण्‍य, चंदोली राष्‍ट्रीय उद्यान व राधानगरी वन्‍यजीव अभयारण्‍य यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ अशा पाच राज्यांतील हा १६०० कि.मी. लांबीचा पश्मिम घाट भारतीय मान्सूनच्या प्रवासावर प्रामुख्याने परिणाम घडवत असल्याने देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. 'वर्ल्ड हेरिटेज साइट्स' च्या यादीत समावेश झाल्यामुळे तब्बल ५००० प्रकारच्या सपुष्प वनस्पती, १४० प्रकारचे सस्तन प्राणी ज्‍यामध्‍ये १६ स्‍थानिक अर्थात त्‍याच क्षेत्रात अढळणारे, ५०८ पक्षांच्या प्रजाती यामध्‍येही १६ स्‍थानिक प्रजाती आहेत, १७९ उभयचर प्राणी व असे समृद्ध जैविक धन पश्चिम घाटाला लाभले आहे.  हा पश्चिम घाट हिमालयीन पर्वतांपेक्षा वयाने मोठा आहे.

पश्चिम घाटासोबतच देशातील २९ स्‍थळांचा यूनेस्‍कोच्‍या जागतिक वारसा स्‍थळांमध्‍ये समावेश आहे. यामध्‍ये ६ नैसर्गिक तर २३ सांस्‍कृतीक स्‍थळे आहेत. यूनोस्‍कोच्‍या या यादीत महाराष्‍ट्रातील पश्चिम घाटातील चार स्‍थळांव्‍यतिरिक्‍त आणखी पाच स्‍थळांचा समावेश आहे. अजिंठा लेण्‍या, वेरुळच्‍या लेण्‍या, एलिफंटा लेण्‍या, छत्रपति शिवाजी टर्मिनस, कास पठार, कोयना वन्‍यजीव अभयारण्‍य, चंदोली राष्‍ट्रीय उद्यान व राधानगरी वन्‍यजीव अभयारण्‍य ही आता महाराष्‍ट्रातील जागतिक वारसा स्‍थळांच्‍या यादीत सामाविष्‍ठ आहेत.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310408
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
360
384
1158
306392
6684
9677
310408

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 23 guests and no members online