चालू घडामोडी

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण २३ विधेयकांपैकी १७ विधेयके मंजूर झाली असून सहा विधेयके प्रलंबित असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

दोन्ही सभागृहात संमत विधेयकांची यादी पुढीलप्रमाणे :

Read more...

राज्यात गुटखा, पानमसाला विक्रीवरबंदी

राज्यात गुटखा, पानमसाला पदार्थांचे उत्पादन, साठवणूक,वितरण आणि विक्री करण्यास एक वर्षासाठी बंदी घालण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलाअसल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी निवेदनाद्वारे १२ जुलै २०१२ रोजी विधानसभेत सांगितले.

मध्यप्रदेश, बिहार व केरळ राज्यात केवळ तंबाखुयुक्त गुटख्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र गुटख्यासह पानमसाला या पदार्थावर बंदी घालण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भाग केंद्रशासित करावा : विधानसभेत एकमताने ठराव संमत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा, असा ठराव विधानसभेत दिनांक १२ जुलै रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला व विधान परिषदेत स्‍वतः सभापती शिवाजीराव देशमुख यांनी हा ठराव मांडला. या ठरावाला सर्वांनी मान्यता देऊन हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. १९६० पासून १८ वेळा ठराव संमत करण्यात आला असून २०१० मध्ये पंतप्रधानाचीही भेट घेण्यात आली आहे.

राष्‍ट्रपती निवडणुक २०१२ करीता दोन उमेदवार

४ जुलै २०१२ ही राष्‍ट्रपती निवडणुकीतून नाव परत घेण्‍याची शेवटची तारीख होती. या मुदतीनंतर नव्‍या राष्‍ट्रपतीच्‍या निवडणुकीकरीता दोन उमेदवार आता प्रत्‍यक्ष रींगणात आहेत. ते म्‍हणजे पुर्णो अगितोक संगमा व प्रणब मुखर्जी.

महाराष्‍ट्रातील एकूण ८ स्‍थळे जागतिक वारसा यादीत

यूनेस्‍कोच्‍या जागतिक वारसा स्‍थळांच्‍या यादीत १ जुलै २०१२ रोजी भारताच्‍या पश्चिम घाटास सामा‍विष्‍ठ करण्‍यात आले. रशियाच्‍या सेंट पिटर्सबर्ग शहरात इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) समितीच्या ३६ व्‍या सत्राच्‍या बैठकीत रविवारी जगातील २१ देशांमधील पर्यावरणतज्ज्ञ उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

Read more...

राज्यात चार नवीन अभयारण्यांची स्थापना

राज्यातील नवीन माळढोक, नवीन बोर, नवीन नागझिरा, नवीन नवेगाव अशा एकूण ५१० चौरस किलोमीटर क्षेत्राच्या ४ अभयारण्यांची स्थापना आणि ताडोबा ते नवेगावमधील उमरेड येथील अभयारण्यास मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची ६ वी बैठक मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार ७  जून २०१२ रोजी घेण्यात आली

गटविकास अधिकाऱ्यांची वर्ग २ पदे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय

गटविकास अधिकाऱ्यांची वर्ग २ ची पदे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा, तसेच सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्याचा निर्णय झाला. सध्या वर्ग दोनची गटविकास अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी ९३००-३४८०० ग्रेड पे ४४०० इतकी आहे, ती आता १५६००-३९१०० ग्रेडपे ५४०० एवढा होईल.

Read more...

मनपा, नगर परिषद सदस्यांविरूद्ध खटला चालविण्यास मान्यता देण्याचे अधिकार शासनाकडे

महानगरपालिका, नगर परिषद सदस्यांच्या विरूद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता व लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली खटला भरण्यासाठी संबंधित प्राधिकरणाला परवानगी देण्याचा अधिकार शासनाला देण्याची तरतूद महानगरपालिका व नगरपालिका अधिनियमात करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

Read more...

बेदाणे व मनुकावरील मूल्यवर्धित करमाफीस मुदतवाढ

बेदाणे व मनुका या वस्तूंना ३१ मे २०१३ पर्यंत मूल्यवर्धित करामधून माफी देण्यात येईल. सध्या या वस्तू ३१ मे २०१२ पर्यंत व्हॅट मुक्त आहेत. हा कर माफ केल्यामुळे अंदाजे २५ कोटी रुपयाचे नुकसान शासनास सोसावे लागेल.

निर्णयाचा लाभ :- या निर्णयामुळे मनुका व बेदाणे बनविणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल. 

पार्श्वभूमी :- सध्या ही उत्पादनाची प्रक्रिया शेतकरी स्वत: करतात आणि व्यापाऱ्यांना मनुका व बेदाणे विकतात. या विक्रीवर कर आकारण्यात येत नाही त्यामुळे काजू उत्पादकांसारखीच औद्योगिक विकास अनुदानाची योजना त्यांच्याबाबतीत राबविता येत नाही. यामुळे असा कर माफ करावा अशी विनंती या उत्पादकांकडून वारंवार होत होती. 

मनुका आणि बेदाण्यांवर सध्या आकरण्यात येणारा ५ टक्के मूल्यवर्धित कर स्थगित ठेवण्याचे शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी दिनांक २३ मे २०१२ रोजी झालेल्या बैठकीत बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.


राज्यात ७१ नवीन उपविभागांची निर्मिती

महसूल विभागाच्या पुनर्रचनेकरिता नेमण्यात आलेल्या बोंगिरवार अभ्यास गटाने केलेली शिफारस आज मान्य करण्यात आली असून, त्यामुळे राज्यात ७१ नवीन उपविभाग निर्माण करण्यात येतील. तसेच या उपविभागांसाठी ३९६ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी दिनांक २३ मे २०१२ रोजी झालेल्या बैठकीत बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310439
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
391
384
1189
306392
6715
9677
310439

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 52 guests and no members online