सी-डॅक तर्फे एससी व ओबीसी विद्यार्थ्‍यांसाठी १२वी नंतरचे कोर्सेस

सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार तर्फे अनुसूचित जाती (एससी) व अन्‍य मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्‍यांकरीता अधिकृत प्रतिनिधी कार्यालयांकडून जॉब ओरिएन्‍टेड कोर्सेस देऊ करण्‍यात येत आहेत. सेंटर फॉर डेव्‍हलपमेंट ऑफ अॅडव्‍हान्‍स्‍ड कंप्‍यूटिंग (सी-डॅक) या संचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्‍या महत्‍वपूर्ण संशोधन व विकास संस्‍थेतर्फे वरील वर्गातील विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देऊन त्‍यांना खाजगी क्षेत्रात नोकरीच्‍या संधी प्रदान केल्‍या जातील. हे कोर्सेस विद्यार्थ्‍यांना संचार, माहिती तसेच तंत्रज्ञानात कारकीर्द घडविण्‍यास उपयुक्‍त ठरतील.

प्रवेश केवळ अनुसूचित जाती व अन्‍य मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी आहे. सर्व स्रोतांपासून मिळून संपूर्ण कुटुंबाची मिळकत वार्षिक दोन लाखांच्‍या आत असणे आवश्‍यक आहे. या योजनेचा लाभ एका विद्यार्थ्‍याला केवळ एकदाच घेता येईल.

किमान पात्रताः १२वी, अपेक्षितः पदवीधर

कोर्सेसः

  • Diploma in Information Technology (DIT)
  • Advanced Diploma in Information Technology (ADIT)
  • Diploma in Multimedia Creation (DMC)
  • Diploma in PC Hardware & Networking (DPCHN)
  • Diploma in Web Technology – Core & Enterprise Java(DWT)

आपल्‍या जवळच्‍या शहरातील सी-डॅक केंद्रात उपलब्‍ध अर्ज पूर्ण भरुन दिनांक ३१ जुलै २०१२ च्‍या सी-डॅक केंद्रात जमा करण्‍यात यावा. अर्ज व कोर्स बाबत अधीक माहिती करीता cdac.inacts.cdac.in किंवा acts.cdac.in/Actsonline/socialjustice/Courses.html या लिंकवर भेट द्या.

अर्ज डाऊनलोड करण्‍यासाठी acts.cdac.in/Actsonline/socialjustice/Application_form.pdf या लिंकला भेट द्या.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310461
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
413
384
1211
306392
6737
9677
310461

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 70 guests and no members online